मुंबई

सावधान! मुंबईत मुलांना शाळेत दाखल करताय, 246 शाळा आहेत अनधिकृत

तेजस वाघमारे

मुंबई: शिक्षण हक्‍क कायद्याअंतर्गत आवश्‍यक परवानगी न घेतल्‍याने मुंबईतील 246 शाळा अनधिकृत जाहीर करण्‍यात आल्‍या आहेत. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने 230 शाळा अनधिकृत ठरल्‍या आहेत.तर उपसंचालक कायार्लयाअंतर्गत असलेल्‍या 16 शाळा अनधिकृत ठरल्‍या आहेत.

शिक्षण हक्‍क कायद्याअंतर्गत शाळांना दरवर्षी मान्‍यता घेणे आवश्‍यक असते. मात्र अनेक शाळा ही मान्‍यता घेत नाहीत. यामुळे या शाळांना अनधिकृत ठरविल्‍या जातात. मुंबईत एकूण 246 शाळा अनधिकृत ठरल्‍या आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात 230 शाळांनी मान्‍यता न घेतल्‍याने त्‍या अनधिकृत ठरल्‍या आहेत.  उपसंचालक कायार्लयाअंतर्गत असलेल्‍या 16 शाळा अनधिकृत ठरल्‍या आहेत. या शाळांनी वेळीच मान्‍यता नाही घेतली तर येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध लाभ मिळू शकणार नाहीत. शाळांमध्‍ये शिक्षण हक्‍क कायद्यानुसार शाळांमध्‍ये सुविधा आहेत की नाही हे पाहून या शाळांना मान्‍यता देण्‍यात येते. मान्‍यता नसेल तर या शाळांना शिक्षण हक्‍क कायद्यानुसार मिळणारे फायदे मिळू शकत नाहीत. मुंबईसह पालघर, ठाणे जिल्‍ह्यातही अशा परवानगी न घेतलेल्‍या शाळा आहेत. पालघर जिल्‍ह्यात ही संख्या 160, ठाण्‍यात 162 तर रायगडमध्‍ये 12 शाळा अनधिकृत आहेत.  

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
अशा शाळांना एक लाख रुपयांपर्यंतच्‍या दंडाची तरतूद आहे. शिक्षण हक्‍क कायद्यातील तरतूदीनुसार हे प्रमाणपत्र घेणे आवययक असते. तर शाळांनी ही परवानगी नाही घेतली तर त्‍यांना पत्र पाठविले जाते. त्‍यानंतरही परवानगी न घेतल्‍यास प्रतिदिन दहा हजार रुपयांच्‍या दंडाची तरतूद आहे. या शाळांवर कारवाई करण्‍याचे अधिकार उपसंचालक जिल्हाधिकारी यांना याचे अधिकार आहेत, असे असूनही अनेक शाळांवर कारवाई झालेली नाही. यामुळे अशा शाळांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai news 246 unauthorized schools Education Department bombay Municipal Corporation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT